राजस्थानच्या राजसमंदमध्ये केमिकलचा टॅंकर उलटला, 10 जणांचा मृत्यू

405

राजस्थानच्या राजसमंदमधील देसूरी महामार्गावर शुक्रवारी भीषण अपघात घडला आहे. एक केमिकलने भरलेला टॅंकर  उलटून एका कारवर पडला. त्यामुळे टॅंकरच्याखाली दबलेल्या कारमधील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक चिमुकली या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. टँकरखाली अडकलेल्या कारला आणि मृतांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, चारभुजाकडून देसूरीकडे जात असताना टॅंकरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर उलटून समोरुन येणाऱ्या कारवर पडला. या दुर्घटनेमध्येमध्ये टॅंकरखाली कारमध्ये दबलेल्या 10 प्रवाशांना अजूनही बाहेर काढण्यात यश आलेले नाही. प्रवाशांना क्रेनद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न सूरू आहे. कारमधील एक चिमुकली थोडक्यात बचावली आहे. या अपघातात टँकरमधील रसायन महामार्गावर सांडल्याने एक दुचाकी रस्त्यावरून घसरली आहे. सुदैवाने त्यात जिवीतहानी झालेली नाही. या महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या