IPL पूर्वी माजी विजेत्यांना धक्का, संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

997

इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) पुढील महिन्यात 19 तारखेपासून सुरू होणार आहे. यासाठी यूएईमध्ये जोरदार तयारीही सुरू आहे. मात्र तत्पूर्वी माजी विजेत्या संघाला धक्का बसला असून संघातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. राजस्थान रॉयल्स क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याग्निक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राजस्थान रॉयल्सने अधिकृत अकाउंटवरून ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

राजस्थान रॉयल्स क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याग्निक कोविड-19 चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. यूएईला जाण्यापूर्वी फ्रांचाईजीने घेतलेल्या चाचणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर संघातील बाकी सर्व सदस्य कोरोना निगेटिव्ह आहेत, असे ट्विट राजस्थान रॉयल्सने केले आहे.

आयपीएलमध्ये सहभागी होणार सर्व संघ 20 ऑगस्टपर्यंत यूएईमध्ये पोहोचणार आहे. यानंतर सर्व संघ सरावाला सुरुवात करतील, मात्र राजस्थान रॉयल्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संघाच्या सराव सत्रावर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, राजस्थान रॉयल्सने 2008 मध्ये आयपीएलचा पहिला सिझन जिंकला होता. यानंतर मात्र संघाचा परफॉर्मन्स खराब होत गेला.

आपली प्रतिक्रिया द्या