राजेंद्र पाटील यड्रावकर समर्थकांनी केला कर्नाटक पोलिसांचा निषेध

371

कर्नाटक महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेलेले महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसाने धक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिसांनी यड्रावकर यांना ताब्यात घेतले होते. जयसिंगपुरात समस्त यड्रावकर समर्थकांनी येथील क्रांती चौकात रास्ता रोको करून कर्नाटक पोलिसांचा निषेध व्यक्त केला.

शुक्रवार दि. 17 रोजी राज्याचे राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर महाराष्ट्र सीमाभाग लढ्यातील शहिदांना अभिवादन करण्या करता एसटी महामंडळाच्या बसने बेळगावला गेले होते. बेळगाव येथे घटनास्थळावर पोचल्यानंतर यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी आत जाण्यास मज्जाव केला. यावेळी कर्नाटक पोलिसांनी यड्रावरकर यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर त्यांना ताब्यातही घेतले. या घटनेची माहिती समजतात तालुक्यात विविध ठिकाणी यड्रावकर समर्थकांनी रास्ता रोको करून निषेध व्यक्त केला.

येथील क्रांती चौकात नगरसेवक राहुल बडगर, महेश कलगुटगी, उदय खाडे, बजरंग खामकर, बाळासो वगरे, गणेश गायकवाड, राहुल पाटील यड्रावकर संभाजी कोळी, प्रकाश पवार, अर्जुन देशमुख, अमर पाटील यांनी सुमारे पाऊण तास रास्ता रोको केला आणि कर्नाटक पोलिसांचा निषेध व्यक्त केला.तसेच शिरोळ तालुक्यातील ही काही भागात यड्रावकर समर्थकांनी रास्ता रोको केला.

Video – शिवसेनेचे मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कानडी पोलिसांची धक्काबुक्की

आपली प्रतिक्रिया द्या