शिवसेनेचे राजेश सावंत रत्नागिरी उपनगराध्यक्षपदी

22

रत्नागिरी- रत्नागिरी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे राजेश सावंत यांची आज बिनविरोध निवड झाली. स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेकडून प्रशांत साळुंखे, किशोर मोरे आणि भारतीय जनता पक्षाकडून उमेश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.

रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये १७ नगरसेवकांसह शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला होता. आज रत्नागिरी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताच्या जोरावर शिवसेनेचे राजेश सावंत बिनविरोध विजयी झाले. स्वीकृत नगरसेवकांच्या तीन जागांसाठी आज निवड करण्यात आली.

शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा आल्या. त्यामध्ये उपशहरप्रमुख प्रशांत साळुंखे आणि पत्रकार किशोर मोरे यांची निवड करण्यात आली. भाजपकडून उमेश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीनंतर बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी अभिनंदन केले. यावेळी आमदार उदय सामंत, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रमोद शेरे, शहर संघटक बिपिन बंदरकर, प्रसाद सावंत आणि शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या