राजगडावर विलोभनीय दृष्य; सूर्यनारायण पद्मावती आईच्या भेटीला

पुण्यातील राजगडावर काल 25 मार्च 2023 रोजी अत्यंत विलोभनीय दृश्य अनुभवायला मिळाले. सूर्याची पहिली किरणं पद्मावती देवीवर पडली. सकाळी 6 वाजून 39 मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभाऱ्यात प्रवेश करत देवीच्या चरणांना स्पर्श केला. त्यामुळे जणू सूर्यनारायण पद्मावती आईच्या भेटीलाच आल्याची अनुभूती राजगडावर अनुभवण्यास मिळाली.

हे विलोभनीय दृष्य व त्याचे साक्षीदार होण्याचा योग असणारा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध चतुर्थी. मिळालेल्या माहितीनुसार राजगडावरील हा किरणोत्सव पहिल्यांदाच अनुभवण्यास मिळाला. राजगडावरील हा किरणोत्सव चैतन्य रामदास शिंदे या तरुणाने टिपला आहे.