ऐश्वर्या रजनीकांतच्या घरात झाली चोरी, लाखोंचे दागिने लंपास

साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आणि निर्माती ऐश्वर्या रजनीकांतचे लाखोंचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये डायमंड आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी ऐश्वर्याने तिनमुपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ऐश्वर्याने तिच्या तक्रारीत म्हंटले आहे की, चैन्नई येथील तिच्या घरातून डायमंड सेट, जुने सोन्याचे दागिने, नवरत्न सेट , हार आणि बांगड्या आहेत. ऐश्वर्याने हे दागिने  2019 मध्ये तिची बहिण सौंदर्या हिच्या लग्नात शेवटचे घातले होते. त्यानंतर तिने हे दागिने लॉकरमध्ये ठेवले होते. जेव्हा तिने 10 फेब्रुवारीला लॉकर पाहिला त्यावेळी त्यात दागिने नव्हते. जवळपास 3.60 लाखांचे दागिने लंपास केले आहेत.  एफआयआर कॉपीनुसार, ऐश्वर्याने हे दागिने लॉकरमध्ये ठेवले होते आणि घरच्यांना त्याबाबत माहिती होती. ऐश्वर्याने घरात काम करणाऱ्या तिघांवर चोरीचा संशय असल्याचे सांगितले.

ऐश्वर्याने सांगितले की, 2019 मध्ये जेव्हा तिची बहिण सौंदर्याचे लग्न होते तेव्हा हे दागिने घातले होते. लग्नानंतर दागिन्यांचा लॉकर तीन ठिकाणी शिफ्ट केला होता. ऑगस्ट 2021 लॉकरला सेंट मेरी अपार्टमेण्टमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर बीआयटी कॉलनी शिफ्ट केले होते. ऐश्वर्या तिथे अभिनेता धनुषसोबत राहात होती. 9 एप्रिल 2022 मध्ये लॉकरला रजनीकांत यांच्या पोइस गार्डन निवासस्थानी ती शिफ्ट झाली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.