थलायवा रजनीकांत यांनी घेतली कोरोनाची लस; कोरोनाला हरवण्याचा संदेश

कोरोनाचे देशभरात थैमान सुरुच आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लसीकरणही सुरू आहे. अनेक कलाकारांनी लसीकरण करून घेत जनतेला लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. सलमान खान,रितेश देशमुख, धर्मेंद्र यांच्यानंतर आता सुपरस्टार रजनीकांत यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.

रजनीकांत यांची मुलगी सौंदर्याने रजनीकांत यांनी कोरोनाची लस घेतल्याची माहिती सोशल मिडीयावर दिली आहे. रजनीकांत कोरोनाची लस घेतानाचा फोटो तिने शेअर केला आहे. थलायवा रजनीकांत यांनी कोरोनाची लस घेतली आहे. आपण सर्व मिळून कोरोना व्हायरसला पराभूत करूया, असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारानांही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे लसीकरण गरजेचे आहे. आतापर्यंत सोनाक्षी सिन्हा, सैफ अली खान,रितश देशमुख, सलमान खान, धर्मेंद्र,सोनी सूद,अमिताभ बच्चन,मलाइका अरोरा यांच्यासह अनेक कलाकरांनी लस घेतली आहे. आता सुपरस्टार रजनीकांत यांनीही कोरोनाची लस घेत कोरोनाला हरवण्याचा संदेश दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या