रजनीकांतचा ‘२.०’ मराठीत झळकणार

10

सामना ऑनलाईन । चेन्नई

सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘२.०’ या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सध्या सुरू आहे. रजनीकांत यांच्या चाहत्यांना या चित्रपटाद्वारे खास सरप्राइज मिळणार असून जगभरातील २० भाषांमध्ये हा चित्रपट डब केला जाणार आहे. यात तमीळ, तेलुगू, मराठी अशा हिंदुस्थानातील १५ प्रादेशिक भाषांचा समावेश आहे. ‘२.०’ हा ‘रोबोट’ चित्रपटाचा सिक्वेल असून यात अक्षयकुमार व्हिलनची भूमिका साकारणार आहे. तब्बल ४०० कोटी रुपयांचे बजेट असलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारीत प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या