राजकुमार राव विकतोय ‘चायनीज व्हायग्रा’, व्हिडीओ व्हायरल

1514

क्वीन, न्यूटन, ट्रॅप्ड, बरेली की बर्फी, स्त्री अशा गाजलेल्या चित्रपटांमधून दमदार भूमिका साकारणारा अभिनेता राजकुमार राव हा कुठेच दिसत नाहीये. कंगना रणौतसोबत जजमेंटल है क्या या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. आता तो पुन्हा एकदा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

राजकुमारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये तो चायनीज व्हायग्रा विकताना दिसत आहे. आणि जिला तो ते विकतोय ती आहे अभिनेत्री श्रद्धा कपूर. या व्हिडीओमध्ये राजकुमार आपली व्यापारी चुणूक दाखवताना श्रद्धाला चायनीज व्हायग्रा घेण्यासाठी मनवताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

पण, या चर्चा त्याच्या आगामी मेड इन चायना या चित्रपटासंबंधी आहेत. हा चित्रपट निखिल मुसळे याने दिग्दर्शित केला असून यात राजकुमार गुजरातमधील एका मध्यमवर्गीय आणि अयशस्वी उद्योजक माणसाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राजकुमार वेगवेगळे फंडे आजमावत असून त्याचा परिपाक हा व्हिडीओ आहे. या चित्रपटात राजकुमारसोबत अभिनेत्री मौनी रॉयही झळकणार आहे. हा चित्रपट येत्या 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा व्हिडीओ-


View this post on Instagram

When #Stree meets Raghu bhai. @shraddhakapoor #MadeInChina #IndiaKaJugaad 25th October

A post shared by Raj Kummar Rao (@rajkummar_rao) on

आपली प्रतिक्रिया द्या