राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी लाखो भक्तांची मांदियाळी

301

सामना प्रतिनिधी । सिंदखेडराजा

मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मस्थळ राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर शनिवार १२ रोजी सूर्योदयापासुनच महाराष्ट्रसह देशाच्या कानाकोपर्‍यातून माँ साहेब जिजाऊंचे आशीर्वाद घेण्यासाठी जनसागर उसळला होता.

जिजाऊ माँ साहेबांच्या ४२१ व्या जंयतीनिमीत्त असंख्य जिजाऊ भक्तांनी सिदंखेडराजा नगरीत तोबा गर्दी केली होती सूर्योदय समयी मंगलमय वाद्यात ढोलताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये गुलालाची उधळण करीत मराठा सेवा संघ, जिजाऊंचे वंशज शिवाजी राजे, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिजाऊ माँ साहेबांची महापुजा करुन जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. यावेळी असंख्य जिजाऊ भक्तांनी ‘तुमचं आमचं नात काय । जय जिजाऊ जय शिवराय ।।’ या घोषणांनी आसंमत दुमदुमुन गेले होते.

माँ साहेबांचे जन्मस्थळावर हार फुलांनी सजावन करण्यात येवून विविध रांगोळी काढण्यात आल्या होत्या. जिजाऊ माँ साहेब जिजाऊ, सावित्रीमाई, शिवाजी महाराज यांच्या वेशभुषा करुन जिजाऊ राजवाड्यात दाखल झाले होते. सूर्योदयसमयी, मराठा सेवा संघाच्या वतीने प्रमुख दाम्पंत्यांनी जिजाऊ पुजन केले. विजयकुमार घोगरे, जयश्री कामाजी पवारी, विना लोखंडे, रेखा दत्तात्रय चव्हाण, वंदना मनोज आखरे, अर्चना सुभाष कोल्हे, किरण ठोसरे, ज्योती शिवाजी जाधव, अरुणा योगेश पाटील, लखुजीराव जाधव यांचे वंशज संगीताताई शिवाजी राजेजाधव यांनी सपत्नीक तसेच राजुकाका राजे जाधव, संदीप राजे जाधव, प्राचार्य अरुण राजे जाधव यांनी पूजन केले.

sindhkhed

नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, उपनगराध्यक्ष सिमा मुरलीधर शेवाळे, मुख्याधिकारी एच.डी. विर व त्यांच्या सर्व आजी माजी नगर अध्यक्ष तसेच नगरवेक व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे व त्यांनतर शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, राजश्री जाधव सपत्नीक, शिवसेना मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, उषा खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत, युवासेना जिल्हा युवाअधिकारी ऋषीकेश जाधव, श्रीनिवास खेडेकर, अतिश तायडे, शिवप्रसाद ठाकरे, संजय मेहेत्रे यांनी अभिवादन केले, तर भाराकॉंचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे, जयश्री सुनिल शेळके, जगन ठाकरे, मनोज कायंदे, शहाजी चौधरी यांनी अभिवादन केले.

डोंबारी कलेचे सादरीकरण जिजाऊसृष्टीवर जिजाऊ भक्तांनी अनुभवले. राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांच्या जन्मोत्सवानिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या लाखो भक्तांना मोफत नाष्टा, चहा आणि पाण्याचे वाटप सोलापूर येथील विधानपरिषदेचे आमदार प्रा.डॉ. तानाजिराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेशभैय्या डोंगरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

देशभरातून आलेल्या जिजाऊ भक्तांसाठी आमदार प्रा.डॉ. तानाजिराव सावंत यांच्यावतीने ३०० क्विंटल पोहे, २२० तेलाचे डबे, ३० क्विंटल शेंगदाणे, ७ पोते साखर, अडीच हजार लिटर दूध व पिण्याच्या पाण्यासह चहा, पोहे बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य देण्यात आले. राजवाडा ते जिजाऊ सृष्टीपर्यंत सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी बाळासाहेब पाथरकर, अजय देशमुख, हनुमंत शिंदे, कृष्णा दांगट आदींची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या