आईला मला वेश्या बनवायचंय, मुलीच्या आरोपानंतर महिलेला अटक

2279

राजस्थानमध्ये एका अल्पवयीन मुलीने आपल्या आई विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या मुलीने आई आपल्याला जबरदस्त वेश्याव्यवसायात ढकलत असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे.

सदर मुलगी 16 वर्षांची असून तिची आई मुंबईत वेश्याव्यवसाय करते. आई मुंबईत असताना मुलगी तिच्या आजी आजोबांकडे राहते. दरम्यान लॉकडाऊनमुळे या मुलीची आई त्यांच्या धौलपूरमधील गावी आली होती. लॉकडाऊन संपल्यावर आई मुलीला माझ्यासोबत मुंबईला चल व पैसे कमव असे सांगू लागली. मुलीने पैसे कमवायला काय करावे लागेल असे विचारले असता आईने तिला तिच्यासारखेच वेश्येचे काम करावे लागणार असे सांगितले. मात्र मुलीला ते काम करायचे नव्हते तिला आजी आजोबांकडे राहून पुढे शिकायचे होते. त्यामुळे तिने आईसोबत जाण्यास नकार दिला. मात्र आई तिला सोबत नेण्यास जबरदस्ती करू लागली. म्हणून या मुलीने थेट पोलीस ठाणे गाठले व पोलीस अधिक्षक केसर सिंह शेखावत यांची भेट घेत आई विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या