राजू शेट्टी यांचा सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा

शेतकऱ्यांच्या हितासाठी गरज पडल्यास बळीराजाची फौज घेऊन प्रसंगी दिल्लीवर चाल करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे.

सांगली येथील विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला हार घालून कृषी विधेयक कायदा रद्द करा आणि वीज बिल माफ करा, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी माजी खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. सांगलीपासून या मोर्चाला सुरुवात झाली असून कोल्हापूर येथील दसरा चौकात या मोर्चाची सांगता झाली.

आपली प्रतिक्रिया द्या