राज्यसभेसाठी नाईक आणि तेंडुलकरांचे अर्ज सादर

10

सामना ऑनलाईन । गोवा

गोव्यातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज भाजप आघाडीतर्फे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि काँग्रेसतर्फे विद्यमान राज्यसभा सदस्य आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी आपापले उमेदवारी अर्ज विधानसभा सचिवांकडे सादर केले.

भाजप आघाडीने तेंडुलकर यांचे नाव जाहीर केल्यानंतर काँग्रेस हायकमांडने काल विद्यमान राज्यसभा सदस्य तथा नूतन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचे निश्चित केले.

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप आघाडीकडे २१ सदस्य असल्याने भाजपचे पारडे जड आहे. काँग्रेसकडे १६ सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चिल आलेमाव कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे स्पष्ट झालेले नाही. भाजप आघाडीमध्ये सहभागी पक्ष आणि काही अपक्ष आमदार धर्मनिरपेक्ष तत्त्व मानत असल्याने ते आपल्याला साथ देतील असा विश्वास काँग्रेस उमेदवार नाईक यांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या