भारतीच्या लग्नातला राखीचा नागिण डान्स बघितला का?

241

सामना ऑनलाईन । मुंबई

राखी सावंत प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काय करेल याचा नेम नाही. नुकतंच राखी सावंतचा भारतीच्या लग्नातील नागिण डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात राखी भारतीच्या नातेवाईकांना घेऊन कॅमेऱ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी नाचत असल्याचे दिसत आहे.

भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांच्या लग्नाच्या मेहंदीच्या कार्यक्रमात राखी सावंत देखील आली होती. या कार्यक्रमाला तिने हिरव्या व लाल रंगाचा फारच विचित्र ड्रेस घातला होता व त्यावर हिरव्या रंगाचा गॉगल घालून आली होती. मेहेंदीच्या कार्यक्रमात राखीने भारतीच्या दोन तीन नातेवाईकांना घेऊन नागिण डान्स केला आहे. तर आणखी एका व्हिडिओत ती आरजे मलिष्का सोबत थिरकताना दिसत आहे. मलिष्कासोबत नाचताना राखीने तिला येत नसलेल्या भरतनाट्यमच्या स्टेप्सही करण्याचा प्रयत्न केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या