राखी पौर्णिमेच्या दिवशीच भयंकर घटना, दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

1178

राखी पौर्णिमेच्या दिवशी झारखंड राज्यात 14 वर्षांच्या आणि 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचं वृत्त आहे. झारखंडमध्ये यापूर्वीही अशा घटना घडल्या असून दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, झारखंड येथील गढवा जिल्ह्यात या दोन्ही घटना घडल्या आहेत. गढवा शहर भागात राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीचं आरोपीने अपहरण केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर अपहरण आणि बलात्कार तसेच पोक्सो अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गढवा जिल्ह्यातील डंडई येथेही घरात एकट्या असलेल्या एका 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला आणि 24 तासांत आरोपीला अटक केली आहे.

झारखंडमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं चित्र आहे. यापूर्वीही 29 जुलै रोजी दोन अल्पवयीन मुलींवर 12 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. मात्र, अद्याप या प्रकरणातील आरोपी पकडले गेलेले नाहीत. त्यात आता या दोन नवीन प्रकरणांची भर पडल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या