राखी सावंतच्या एक्स बॉयफ्रेंडला तरुणीने केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल

19394

आयटम गर्ल राखी सावंत हिच्यासोबत लग्नाच्या घोषणा करून नंतर तिलाच शिव्या देणाऱा तिचा एक्स बॉयफ्रेंड दीपक कलाल याला दिल्लीत ट्रेनमध्ये मारहाण झाली आहे. एका तरुणीने त्याला कानफटवले असून त्या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या मारहाणीनंतर दीपक कलालने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत त्या तरुणीला धमकी दिली आहे.

दीपक कलाल हा मेट्रोने प्रवास करत असताना त्या तरुणीने त्याची परवानगी न घेता त्याच्यासोबत सेल्फी काढला. त्यामुळे दीपक कलाल भडकला. त्याने त्या मुलीला बडबडायला सुरुवात केली. त्याची अश्लाघ्य भाषा ऐकून त्या तरुणीने त्याला कानाखाली मारली. त्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


View this post on Instagram

À 2 kodi ki Selfie Girl ab tu dekh tera haal kya hoga… Bahot Bhutkegi Tu …..Dek lio….

A post shared by Deepak Kalal (@deepakkalalofficial) on

त्या मारहाणीनंतर दीपक कलालने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत त्या तरुणीला धमकी दिली आहे. त्यात त्याने त्या तरुणीला ‘दो टके की लडकी’ म्हटले आहे. ‘ऐ मुली तु दिपक कलाल ची सेल्फी घेतली. ते ही मला न विचारता. आता मी नरेंद्र मोदींना सांगून तुला माझ्या हॉटेलमध्ये बोलवून घेतो. तु ब्युटी मोडशिवाय माझा फोटो घेतलास ना. आता बघ तुझी मी काय अवस्था करतो’, अशी धमकी दीपक कलालने दिली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या