होळी खेळू नका, कोरोना व्हायरस पसरेल; राखी सावंतचे आवाहन

940

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत तीन हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्थानमध्येही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून आतापर्यंत सहा जणांना याची लागण झाली आहे. त्यामुळे नोएडा दिल्लीनंतर तेलंगणातही या आजाराचे काही रुग्ण आढळून आले आहेत.


View this post on Instagram

Dear All, Please note that CORONA VIRUS is very harmful and dangerous for our life. We request to take this seriously and try to take precautions from this. HOLI festival is coming and most of colour ballons and all products are made of china products. We never know from where this virus will effect us. Request you all to for atleast this year avoid to play HOLI and dont make any arrangement for same at your society or near premises. For 2-3 hrs enjoyment may take somebody life at risk.Please SAVE your Life and people surrounding you. Our premises need to kept clean and take measures to avoid outdoor particle or object or material that can create damage. Please dont make HOLI festival to play with someone LIFE.. ..kindly share this message to create awareness.

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

सर्वत्र थैमान घालणाऱ्या या आजारामुळे सर्वच नागरिक धास्तावले आहेत. त्यात सोशल मीडियावरून पसरवली जात असणारी माहिती या भीतीत अधिक भर घालत आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण असतानाच आयटम गर्ल राखी सावंत हिने देखील एक व्हिडीओ पोस्ट करत ‘कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी या वर्षी होळी खेळू नका’ असे आवाहन केले आहे.

‘होळीत आपण जे रंग, फुगे, पिचकाऱ्या वापरणार ते चीनमध्ये तयार केलेले आहेत. भलेही ते आधी आले असतील पण मला मिळालेल्या माहितीनुसार हे होळीचे साहित्य बनवत असताना देखील तिथे कोरोना व्हायरस हा आजार होता. त्यामुळे जर हे रंग फुगे आपण वापरले तर त्याने कोरोना व्हायरस अधिक पसरेल. मी यावर्षी होळी नाही खेळणार नाही’, असे आवाहन तिने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या