श्री संत मुक्ताबाई संस्थानचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात

हिंदू धर्म संस्कृती, अनेकविध रूढीपरंपरा, व्रतवैकल्य यांनी नटलेला आहे. बहिण-भावाच्या नात्याची वीण अधिकाधिक घट्ट विणणारा सण म्हणजे रक्षाबंधन. आळंदीसह राज्यात सर्वत्र रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव येथे रक्षाबंधानाची प्रथा आजही पाळली जाते. अतूट प्रेमाचे बंधन असलेली राखी संत मुक्ताईने आपल्या भावांना बांधणे, हा सोहळा पार पाडण्याकरिता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर राखी स्पर्शित करून बांधण्याचे येथे परंपरा आहे. त्याप्रमाणे आज हा अनोखा सोहळा येथे साजरा करण्यात आला.

रक्षाबंधनानिमित्त संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगरचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी विश्वस्त प्रतिनिधी पाठवून त्र्यंबकेश्वर, आळंदी, सासवड, आपेगाव या समाधी स्थळावर जाऊन संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ आणि सोपानदेव या तिन्ही बंधूंना राखी बांधण्यात आली. रक्षाबंधन दिनाच्या पर्वावर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी येथे मुक्ताई संस्थानचे विश्वस्त संदिप पाटील, अंकिता पाटील यांनी मुक्ताईचे विधीवत पूजन केले आणि माऊलींच्या संजीवन समाधीवर राखी अर्पण केली.

यावेळी माऊलींचे पुजारी श्री योगेश महाराज चौधरी, श्री ह भ प सागर महाराज लाहुडकर,आळंदी देवस्थान कमिटी व्यवस्थापक ज्ञानेश्वर विर व भाविक उपस्थित होते. श्री संत मुक्ताबाई संस्थान, आळंदी शाखेचे व्यवस्थापक गजानन महाराज लाहुडकर यांनी यावेळी हा उपक्रम अनेक वर्षांपासून आळंदी मंदिरात राबवला जातो. आजही हा रक्षाबंधनाचा सोहळा  प्रथा दरव म्हणाले अनेक वर्षांपासून आळंदी मंदिरात दरवर्षी उपक्रम राबविला जात आहे.