उरणमध्ये मतदान दिनानिमित्ताने जनजागृती रॅली

447

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने शनिवारी उरण तहसीलदार कार्यालयापासून शहरातून मतदार जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली होती. उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या रॅलीत सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, नायब तहसीलदार संदीप खोमणे,उरण नगर परिषद,उरण पंचायत समिती आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले होते. या जनजागृती रॅलीच्या निमित्ताने पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. राष्ट्राच्या निर्मितीसाठी लोकशाहीच्या तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. मतदान करणे ही देशसेवा आहे. लोकशाही वृध्दींगत होण्यासाठी नवमतदारांनी मतदानात उत्साह दाखवावा, असे आवाहनही या जनजागृती रॅलीतून करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या