महापौरांच्या घरातील कुत्रा म्हणून जन्म व्हावा, प्रसिद्ध दिग्दर्शकाने व्यक्त केली इच्छा

लोकांचं कुत्र्यांवर असलेलं प्रेम हा अनेकदा चर्चेचा विषय असतो. श्वानप्रेमी मंडळी त्यांच्या कुत्र्यांना घरचा सदस्य समजून वागत असतात. ही मंडळी घरच्या मंडळींसोबत वागतो तसं वागत असताना त्यांच्यासोबत जेवतात, झोपतात आणि फिरायलाही जातात. हैदराबादच्या महापौर विजयालक्ष्मी या देखील अशा श्वानप्रेमी मंडळींपैकी एक आहे. विजयालक्ष्मी यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीमध्ये त्या त्यांच्या कुत्र्यासोबत जेवायला बसलेल्या दिसत आहेत. एका हाताने त्या कुत्र्याला घास भरवतात आणि दुसऱ्या हाताने स्वत: घास घेतात असं या व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी हे ट्विट करत असताना म्हटलंय की ‘हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मला वाटतंय की विजयालक्ष्मी या श्वानप्रेमात बेहोश झाल्या आहेत किंवा त्यांना बेहोश कुत्र्यावर प्रेम जडलं आहे. प्रश्न हा आहे की त्यांना कुत्र्याइतकंच जनतेवरही प्रेम आहे का? मी मनापासून प्रार्थना करतो की जर महापौरांनी असेच प्रेम दिले तर माझा पुढचा जन्म त्यांच्या घरचा कुत्रा म्हणून व्हावा’

आपली प्रतिक्रिया द्या