Ram Mandir भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी येणार नाही?

2050

राम मंदिरासाठी देशभर यथरात्रा काढणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lalkrishna Advani)  आणि मंदिरासाठी संघर्ष करणारे मुरली मनोहर जोशी (Murli Manohar Joshi) यांना अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या (Ram Mandir Bhoomi Pujan) मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला येणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. या कार्यक्रमात हे दोघे जण सहभागी गोण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे.

#AYODHYAVERDICT राम मंदिरासाठी लालकृष्ण आडवाणी यांचे योगदान महत्त्वाचे – उमा भारती

या कार्यक्रमासाठी फार मोजक्या लोकांना बोलावण्यात आलं असून निमंत्रितांच्या यादीत एकही मोठा उद्योगपती किंवा परदेशात स्थायिक हिंदुस्थानी नागरीकाचा समावेश नाहीये. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीमध्ये म्हटलंय की अयोध्येला जाण्याचा लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा कार्यक्रम बनलेला नाहीये.

#AYODHYAVERDICT- राम मंदिराचे काम हे राष्ट्र बांधणीचे कार्य, आडवाणींची पहिली प्रतिक्रिया

भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, राम जन्मभूमी न्यास ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि महंत नृत्यगोपालदास महाराज उपस्थित असणार आहेत.

काशी येथील ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंदिराचा शिलान्यास होणार आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची 18 जुलै रोजी यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांच्यासह 12 सदस्य सामील होते. तीन सदस्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभाग घेतला. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनी पंतप्रधानांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण याआधीच पाठवले होते. 18 जुलै रोजी राम मंदिर ट्रस्टकडून 3 किंवा 5 ऑगस्टच्या तारखेचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. पंतप्रधान कार्यालयाकडून 5 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली होती.

तीन मजल्यांवर प्रत्येकी 106 खांब

  • 14 फूट आणि 6 इंचाचा एक खांब असून त्यामध्ये 16 मूर्ती कोरल्या जाणार आहेत.
  • 268 फूट लांब आणि 140 फूट रुंद असे मंदिर राहणार आहे.

असा असेल भूमिपूजन सोहळा
भूमिपूजनासंबंधित कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासूनच सुरू होणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजनाचे सर्व विधी काशी येथील ब्राह्मण पार पाडणार असून पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते मंदिराचा शिलान्यास होणार आहे.

राम मंदिर निर्माण साडेतीन वर्षांत
पावसाळ्यानंतर मंदिर निर्माणाच्या कार्याला सुरुवात होईल. मंदिर निर्मितीच्या निधीसाठी 10 कोटी कुटुंबांकडे आर्थिक सहाय्यासाठी संपर्क केला जाणार आहे. मंदिर निर्मितीचा आराखडा तसेच निधी संकलन झाल्यानंतर साडेतीन वर्षांत या मंदिराची निर्मिती पूर्ण होईल असे ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले.

मंदिर 318 खांबांवर उभे राहणार
रामलल्लाचे मंदिर 120 एकर जागेत उभे राहणार असून 161 फूट उंचीचे 5 घुमटांसह 318 खांबांवर उभे राहणारे हे जगातील पहिले मंदिर असणार आहे, असे राम मंदिराचा आराखडा तयार करणारे वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या