श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास कोरोना पॉझिटिव्ह

982
nritya-gopal-das-new

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. नृत्य गोपाळ दासांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांना ऑक्सिजन पुरवण्यात येत आहे. महंत नृत्य गोपाळ दास हे सध्या मथुरेत आहेत. नृत्य गोपाळ दास यांच्या उपचारासाठी आग्रा येथील सीएमओ आणि सर्व डॉक्टर दाखल झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्य गोपाल दास, त्यांचे समर्थक आणि मथुराचे जिल्हादंडाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. यासह सीएम योगी यांनी मेदांता रुग्णालयाचे डॉक्टर नरेश त्रेहान यांच्याशी बोलणे केले आहे. महंत नृत्य गोपाल दास यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, प्रत्येक श्रीकृष्ण जन्माष्टमी दरम्यान नृत्य गोपाळ दास मथुरा येथे येतात. मथुरा दौर्‍यादरम्यान आज त्यांची प्रकृती खालावली. त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. यानंतर त्याची कोरोना टेस्ट झाली. त्यांचा कोरोना निकाल पॉझिटिव्ह आला आहे.

विशेष म्हणजे, अयोध्येत रामललाचे दोन पुजारी अयोध्येत कोरोनाने संक्रमित असल्याचे आढळले. याशिवाय बरेच पोलीस देखील कोरोना पॉझिटिव्हही आढळले. कोरोना संकट पाहता रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मास्क आणि सामाजिक अंतर ठेवले गेले.

आपली प्रतिक्रिया द्या