अयोध्या प्रकरणाच्या निर्णयापूर्वी मौलवी, संघ नेत्यांची बैठक; शांतता राखण्याचे आवाहन

राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने आपला निर्णय राखीव ठेवला आहे. 8 नोव्हेंबरपर्यंत कधीही या प्रकरणी अंतिम निर्णय येऊ शकतो. न्यायालयाच्या अंतिम निर्णयापूर्वी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या निवासस्थानी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला मुस्लिम धर्मगुरू, मौलवी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते उपस्थित होते.

अयोध्या प्रकरणाचा निर्णय उदारपणे स्वीकारा, रा.स्व. संघाचे आवाहन

अयोध्या प्रकरणाचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता पाहता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये न्यायालय जो काही निर्णय देईल तो उदारपणे स्वीकारून शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले. याच अनुषंगाने दोन्ही समुदायाच्या नेत्यांनी बैठकीमध्ये सहभागी करून घेण्यात आले.

अयोध्यात हालचालींना वेग, कलम 144 लागू केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात संघाचे नेते आणि मुस्लिम मौलवी यांच्यासोबत भाजप नेते शहानवाज हुसैन आणि चित्रपट निर्माते मुजफ्फर अली हे उपस्थित असल्याचे दिसून येते.

यापूर्वी भाजप आणि आरएसएसने अयोध्या प्रकरणाचा निर्णय उदारपणे स्वीकारा असे आवाहन केले होते. ‘काही दिवसांत श्रीराम जन्मभूमी वरील मंदिर निर्माण वादावरील सर्वोच्च न्यायायलाचा निर्णय येण्याची शक्यत आहे. जो काही निर्णय येईल तो खुल्या मनाने स्विकारला पाहिजे. निर्णयानंतर संपूर्ण देशातील वातावरण सौहार्द राहिले पाहिजे ही सगळ्यांची जवाबदारी आहे’, असे ट्वीट आरएसएसने केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या