‘राम-लखन’ला 32 वर्ष पूर्ण, माधुरीने शेअर केला ‘तेव्हा आणि आता’चा खास फोटो

सुभाष घई यांचा सुपरहिट चित्रपट ‘राम-लखन’ प्रदर्शित होऊन बुधवारी 32 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने एक खास फोटो शेअर केला आहे.

‘राम-लखन’ हा चित्रपट 27 जानेवारी, 1989 ला प्रदर्शित झाला होता. त्या काळात सुपरहिट झालेल्या चित्रपटामध्ये अभिनेता अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, अभिनेत्री माधुरी दिक्षित यासारख्या टॉपच्या कलाकारांनी काम केले होते. ‘बत्तीशी’ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माधुरीने सोशल मीडियावर ‘तेव्हा आणि आता’ असा एक फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये एक जुना फोटो आणि एक नवा फोटो दिसतोय. यात चित्रपटात काम केलेले कलाकार दिसत आहेत.

माधुरीने फोटोला एक कॅप्शनही दिली आहे. ‘राम-लखन’ला 32 वर्ष पूर्ण झाली आणि त्या खास क्षणांना आम्ही सेलेब्रिट करत आहोत. संपूर्ण टीमचे कठोर परिश्रणाला पाहण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आणि तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद, असे माधुरीने चाहत्यांना म्हटले आहे.

कारकीर्दीतील माइलस्टोन

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी हा चित्रपट माझ्या कारकीर्दीतील माइलस्टोन असल्याचे म्हटले. हा चित्रपट एक व्यवसायिक हिट होता. या चित्रपटानंतर माझी कारकीर्दच बदलली, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या