‘रुग्णालयापेक्षा मंदिर संस्कृती महत्त्वाची’, भाजप नेते दिलीप घोष यांचे विधान

789

अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाला विरोध करणार्‍यांना शुक्रवारी भाजप पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी लक्ष्य केले आहे. घोष म्हणाले की, ‘अयोध्येत रुग्णालय बांधण्याची मागणी करणाऱ्या लोकांमध्ये बुद्धीची कमतरता आहे. रुग्णालय संस्कृतीपेक्षा मंदिर संस्कृती अधिक महत्वाची आहे’.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार दिलीप घोष म्हणाले, ‘जे लोक अयोध्येत रुग्णालयाच्या बाजूने बोलत आहेत, ते स्वत: जनतेला योग्य आरोग्य सुविधा देण्यात अपयशी ठरले आहेत.’ यावेळी त्यांनी कोणत्याही व्यक्तीचे अथवा पक्षाचे नाव घेतले नाही. ते म्हणाले की, ‘ज्यांना आपल्या धर्माबद्दल बोलण्यास भीती वाटते ते राम मंदिर बांधण्याच्या विरोधात बोलत आहेत. मात्र ज्यांना आपल्या श्रद्धेचा अभिमान आहे आणि जे भगवान रामांची पूजा करतात त्यांचं याला समर्थन आहे’, असे ते म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या