‘रामायण’ मालिकेतील स्टार्स कसे दिसतात आणि काय करताहेत? वाचा सविस्तर…

3889
काही दिवसांपासून रामायण आणि महाभारत या गाजलेल्या मालिका पुन्हा सुरू झाल्या. या मालिकांसोबतच अनेक मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहेत.

विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी सर्वत्र प्रभु श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्धाची चर्चा सर्वत्र होते. अनेक ठिकाणी आज हजारो वर्षानंतरही रावणाच्या प्रतिमांचे दहन होते. वाईटावर चांगल्याच्या विजयाची ही कथा ‘रामायण’ मधून सर्वांपर्यंत पोहोचली. ‘रामायण’चा उल्लेख होते तेव्हा प्रत्येक वेळी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ ही पौराणिक मालिका सर्वांना आठवते.

25 जानेवारी, 1987 ते 31 जुलै, 1988 दरम्यान प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ ही त्या काळात गाजलेली सर्वात प्रसिद्ध मालिका होती. या मालिकेतील कलाकारांना नागरिकांनी डोक्यावर घेतले होते. आजही त्या भूमिकेच्या नावावरून त्यांची ओळख सांगितली जाते. एवढ्या वर्षानंतरही या मालिकेतील भाग सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. या मालिकेमध्ये काम केलेले कलाकार आता कसे दिसताहेत आणि काय करताहेत पाहूया…

अरुण गोविल

ramayan1
‘रामायण’ मालिकेमध्ये प्रभु श्रीरामाची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविल यांनी नुकतीच साठी ओलांडली आहे. अरुण गोविल यांनी साकारलेली रामाची भूमिका प्रचंड गाजली. ते आता पुन्हा एकदा श्रीरामाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. ‘द लेजेंड ऑफ राम’ या नाटकामध्ये ते रामाची भूमिका साकारणार आहेत.

दीपिका चिखलिया

ramayan12
अरुण गोविल यांच्यानंतर ‘रामायण’मधील सर्वात चर्चिले गेलेले पात्र म्हणजे सीतेचे. दीपिका चिखलिया हिने सीतेची भूमिका साकारली होती. ‘रामायण’सह दीपिका हिने नव्वदच्या दशकात दाक्षिणात्य आणि गुजराती चित्रपटातही काम केले आहे. त्यानंतर 2018 मध्ये आलेल्या गाबिल चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केले.

दारा सिंह

ramayan13
सामानंद सागर यांच्या ‘रामायण’मधील हनुमानाच्या भूमिकेने सर्वत्र आग लागवी होती. दारा सिंह यांनी अतिशय उत्कृष्ठपणे ही भूमिका केली होती. हनुमानाची भूमिका म्हणजे दारा सिंह अशी भावना तेव्हा तयार झाली होती. दारा सिंह यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले. 12 जुलै, 2012 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अरविंद त्रिवेदी

ramayan14
रावणाच्या भूमिकेतील अरविंद त्रिवेदी यांचे कामही सर्वोत्तम मानले जाते. रावणाचा विचार जरी मनात आला तरी अरविंद यांनी साकारलेल्या रावणाची भूमिका डोळ्यासमोर येते. 70 ते 90 च्या दशकामध्ये चित्रपट आणि टीव्ही मालिकेमध्ये त्यांनी काम केले होते. सध्या ते इंडस्ट्रीपासून दूर असून काही कार्यक्रमातही दिसत असतात.

ललिता पवार

ramayan16
बॉलिवूडमधील सर्वात खतरनाक सासू आणि आईच्या भूमिका साकारलेल्या अभिनेत्री ललिता पवार यांनी ‘रामायण’ मालिकेत मंथराची भूमिका केली होती. ललिता यांनी चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रामध्ये बहुमुल्य योगदान दिले आहे. 1998 साली वयाच्या 81 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

सुनील लहरी

ramayan17
रामाच्या आयुष्यामध्ये लक्ष्मण नसता तर जगाला दोन भावांचे आदर्शव्रत प्रेमाचे उदाहरण मिळाले नसते. ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका सुनील लहरी यांनी साकारली होती. अरुण गोविल यांच्या रामाचा फोटो डोळ्यासमोर येतो तेव्हा त्यांच्या शेजारी सुनील लहरी यांनी साकारलेला लक्ष्मणही दिसतो.

आपली प्रतिक्रिया द्या