‘रामायण’ मालिकेतील सुग्रीवाचे निधन, राम-लक्ष्मणाने वाहिली श्रद्धांजली

10365

रामानंद सागर निर्मित आणि 90 च्या दशकात प्रचंड गाजलेल्या ‘रामायण’ ही मालिका डीडी नॅशनलवर पुन्हा एकदा प्रसारित केली जात आहे. याच मालिकेत सुग्रीवाची भूमिका साकारणारे कलाकार श्याम सुंदर यांचे निधन झाले आहे. रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले असून श्रद्धांजली वाहिली आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी सध्या देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 14 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या दरम्यान सोशल मीडियावर चाहत्यांच्या मागणीनंतर डीडी नॅशनलवर ‘रामायण’ या मालिकेचे पुन्हा प्रसारण सुरू करण्यात आले आहे. रामानंद सागर यांच्या 90 च्या दशकातील या मालिकेने पुन्हा एकदा टीआरपीचे सारे रेकॉर्ड तोडले. मात्र याच दरम्यान या मालिकेत सुग्रीवाची भूमिका साकारणारे कलाकार श्याम सुंदर यांनी अखेरचा श्वास घेतला.

रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी ट्विटरवर त्यांना श्रद्धांजली वाहिली. श्याम सुंदर यांच्या निधनाची वार्ता ऐकून दुःख झाले. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये त्यांनी सुग्रीवाची भूमिका साकारली होती. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ, असे ट्विट त्यांनी केले आहे.

तर लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनीही ट्विट करून श्याम सुंदर यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले. सुनील यांनी एका वृत्तपत्रातील बातमी शेअर करत म्हंटले की, आमचे सहकलाकार ज्यांनी रामायण मालिकेत सुग्रीवाची भूमिका निभावली त्यांच्या निधनाची बातमी वाचून दुःख झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ, असे ट्विट त्यांनी केले. या ट्विटखाली शेकडो चाहत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आणि श्याम सुंदर यांना श्रद्धांजली वाहिली.

https://twitter.com/LahriSunil/status/1248142863151456256?s=19

आपली प्रतिक्रिया द्या