राहुल गांधींना निवडून केरळच्या जनतेने विनाशकारी काम केले! इतिहासकार गुहा यांचे विधान

848

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडून देत वायनाडच्या जनतेने विनाशकारी काम केले आहे अशा शब्दात इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. आजच्या हिंदुस्थानाला घराणेशाही नकोय. त्यामुळे 2024मध्ये राहुल गांधी यांना निवडून देण्याची चूक करू नका, असं आवाहन प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी केलं आहे. तर, नरेंद्र मोदी हे स्वयंसिद्ध नेते आहेत, त्यांना एका राज्याचं प्रशासन चालवण्याचा 15 वर्षांचा अनुभव आहे, अशी स्तुतिसुमने गुहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उधळली आहेत.

कोझीकोडे येथील केरळ साहित्य संमेलनात गुहा बोलत होते. 2024च्या निवडणुकांविषयी बोलताना गुहा म्हणाले की, तुम्ही (मल्याळी जनता) राहुल गांधींना का निवडून देत आहात. माझं व्यक्तिशः राहुल यांच्याशी काहीही वैर नाही. ते अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्ती आहेत. पण, आजच्या हिंदुस्थानाला घराणेशाही नको आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना पुन्हा निवडून देण्याची चूक करू नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे. ‘नरेंद्र मोदी हे स्वयंसिद्ध नेते आहेत. त्यांना एका राज्याचं प्रशासन चालवण्याचा 15 वर्षांचा अनुभव आहे. त्यासाठी ते कठोर परिश्रम करतात आणि युरोपमध्ये सुट्ट्यांसाठी जात नाहीत’, अशी स्तुतिसुमने गुहा यांनी पंतप्रधानांवर उधळली आहेत.

कोझिकोड येथे केरळ साहित्य संमेलनात बोलताना गुहा म्हणाले की राहुल गांधी हे अत्यंत सभ्य आहे, आणि मला वैयक्तिकरित्या त्यांच्याबाबत काहीही आक्षेप नाही. मात्र देशाची जनता पाचव्या पिढीतील नेत्याला स्वीकारण्यास तयार नाहीये. जर राहुल गांधी यांना जनतेने पुन्हा निवडून दिले तर त्याचा फायदा नरेंद्र मोदी यांनाच होणार आहे, कारण मोदी यांच्या जनेची बाजू हीच आहे की ते राहुल गांधी नाहीयेत, त्यांनी स्वत:ला घडवलं आहे आणि अनुभव मिळवला आहे.

गुहा यांनी काँग्रेसबाबत बोलताना म्हटले की काँग्रेस पक्ष देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी छेडलेल्या आंदोलनात ‘महान पक्ष’ म्हणून उदयास आला होता. मात्र त्याचे पतन होऊन तो दयनीय कौटुंबिक संस्था झाला आहे. देशातील हिंदुत्वाच्या धारणेस आणि कट्टर राष्ट्रवादाला हे कारण बळकटी देणारं ठरल्याचं मत गुहा यांनी नोंदवलं आहे. गुहा हे राष्ट्रवाद विरूद्ध कट्टर राष्ट्रवाद याबाबत त्यांचे मत नोंदवत होते. गुहा म्हणाले की केरळच्या जनतेने देशासाठी अनेक उत्तम कामे केली आहेत, मात्र राहुल गांधी यांना संसदेत पाठवून तुम्ही विनाशकारी काम केले आहे.

राहुल गांधी जर समजूतदार, अधिक मेहनती आणि युरोपात सुट्टी व्यतित करणारे नसते तरी ते पाचव्या पिढीतील शासक असल्याने स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर पुढे आलेल्या मोदींसमोर ते प्रभावशाली ठरू शकले नसते. गुहा यांनी त्यांच्या भाषणात काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही टीका केली. गुहा म्हणाले की सोनिया गांधींमुळे त्यांना ‘नामशेष झालेल्या मोघल वंशाची’ आठवण येते कारण या मोघलांना आपल्या साम्राज्यात काय चाललंय याची कल्पनाच नव्हती. राहुल गांधी राजकारणात असल्याने पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी कश्मीरमध्ये काय केलं होतं, चीनसंदर्भात काय भूमिका घेतली होती याची तुलना करून चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला जातो. राहुल गांधी जर राजकीय पटलावर नसते तर नरेंद्र मोदी यांना त्यांची धोरणे आणि त्यांच्या असफलतेबाबत बोलावंच लागलं असतं असंही गुहा यांनी म्हटले आहे.

गुहा यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन केलं होतं. तसंच, केंद्र सरकारवर खरी तुकडे तुकडे गँग ही दिल्लीत बसल्याची टीकाही यापूर्वी केली होती. त्यामुळे आता गुहा यांनी घेतलेल्या या नव्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या