आठवले आणि फुटबॉल

21

>>नीलेश कुलकर्णी [email protected]

हिंदुस्थानात फुटबॉलचा प्रसार होण्याच्या ‘उदात्त’ हेतूने केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल व लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या संयुक्त प्रयत्नातून संसदेत प्रत्येक खासदाराला एक ‘फुटबॉल’ भेट देण्यात आला. ‘फिफा’चा अंडर 17 वर्ल्ड कप हिंदुस्थानात होणार असल्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. आता संसदेत खासदारांनी फुटबॉलला किक मारल्याने पेले, रोनाल्डो, रोनाल्डिन्हो हे हिंदुस्थानात कसे जन्माला येतील तसेच फुटबॉलच्या प्रसाराला कशी चालना मिळणार ते देवच जाणे. मात्र सभापतींनी ‘किक’ मारून या कार्यक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर हिंदुस्थानी फुटबॉल संघाचे माजी कर्णधार व तृणमूलचे खासदार प्रसून बॅनर्जी यांनी संसदेच्या प्रांगणात आपल्या सहकाऱ्यांसोबत खेळाचे चांगलेच कौशल्य दाखविले.

बॅनर्जी फॉर्मात असल्याचे पाहून केरळमधील डाव्यांचे खासदारही लुंग्या सावरत मैदानात उतरले. हे सगळे रथी-महारथी फुटबॉल खेळत असताना केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवलेही फुटबॉल घेऊन प्रांगणात दाखल झाले. त्यावेळी महाराष्ट्रातील भाजप खासदारही तिथे होते. मात्र आठवलेंना कोणीही साथ दिली नाही. त्यामुळे बिचारे एकटेच फुटबॉल पास करत राहिले. भाजपने सत्तेत घेऊन मित्रधर्म पाळला असला तरी मैदानात मात्र भाजप खासदार मित्रधर्म पाळत नाहीत हे लक्षात आल्यानंतर आठवलेंनी आपला एकाकी खेळ थांबवला.

आपली प्रतिक्रिया द्या