सैन्यात अनुसूचित जाती, जमातीला आरक्षण देण्यात यावे- रामदास आठवले

16

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी हिंदुस्थानी सैन्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. याबाबत पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचही त्यांनी सांगितलं आहे.

हिंदुस्थानातील मागसवर्गीयांना सैन्यात आरक्षण मिळायला हवं, त्यांना देशसेवेची संधी मिळायला हवी असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी देशसेवा करायला हवी. त्यामुळे तरुणांनी देशसेवा करण्यासाठी सैन्यात भरती होऊन देशासाठी आपलं योगदान देण्याची विनंती रामदास आठवले यांनी केली. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानकडून हिंदुस्थानचा पराभव झाल्यानंतर क्रिकेटमध्ये अनुसूचित जाती-जमातीला २५ टक्के आरक्षण देण्याची मागणी आठवले यांनी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या