Video – मैने बोला था गो कोरोना गो, पर वो मेरे पिछे ही पडगया! रामदास आठवले

संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. ‘पेगॅसस’ प्रकरणावरून वातावरण तापलं आहे. तर दुसऱ्या बाजूला कोरोनावरून देखील विरोधक सरकारला घेरत आहेत. राज्यसभेत दोन्ही बाजूने जोरदार शाब्दिक हल्ले सुरू आहेत. अशातच राज्यसभेत बोलताना गंभीर चर्चेवेळी खासदार रामदास आठवले यांनी कोरोना परिस्थितीवर नेहमीच्या स्टाइलमध्ये कविता म्हटली. आणि वातावरण बदलून गेलं. मोदी सरकारची पाठ थोपटतानाच त्यांनी स्वत:च्या विधानावरून कोपरखळी मारली.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी रामदास आठवले यांनी ‘गो कोरोना गो’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. देशातच नाही तर विदेशातही त्यांच्या घोषणांनी धुमाकुळ घातल होता. राज्यसभेत बोलताना याचा उल्लेख करताना ते म्हणाले, ‘मैने बोला था गो कोरोना गो, पर कोरोना मेरे पास ही आगया. मुझे पता नही की किसने मुझे हात लगाया…’. त्यांच्या विधानामुळे हशा पिकला.

आपली प्रतिक्रिया द्या