‘टेकू’ लागलेल्या बालरंगभूमीला आधार हवाय!

सामना प्रतिनिधी । महाकवी कालिदास नाट्यगृह

मराठी बालरंगभूमीची अवस्था सध्या दुर्मिळ होत चाललेल्या बिबट्यासारखी झाली असून ती ‘टेकू’ लागलेल्या अवस्थेत कशीबशी तग धरून आहे. या बालरंगभूमीला सर्वांनी एकत्र येऊन आधार देण्याची गरज आहे असे भावनिक आवाहन ज्येष्ठ रंगकर्मी विद्या पटवर्धन यांनी केले. बालरंगभूमी वाचविण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून मोर्चा काढण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

आघाडीच्या असंख्य कलाकारांना रंगभूमीचे धडे देणाऱ्या विद्या पटवर्धन यांना आज नाट्यसंमेलनात ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी बालरंगभूमीबाबतची आपली तळमळ व्यक्त केली.

मी रिटायर्ड होणार नाही
मी मूळचा नाटकवाला असून हौशी रंगभूमीने मला खूप काही दिले आहे. नाटकाने शिस्त दिली असून अभिनयाच्या क्षेत्रातून मी रिटायर्ड होणार नाही. शरीर साथ देईपर्यंत अभिनय करीतच राहणार अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भाटकर यांना ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या