
सेक्स स्कँडलमध्ये अडकल्यामुळे राजीनामा द्यावे लागलेले भाजपचे कर्नाटकातील मंत्री रमेश जारकीहोली यांचे एक संभाषण व्हायरल झाले आहे. यात जारकीहोली हे कर्नाटक व महाराष्ट्रामधील सीमावादावर बोलताना कानडी लोकांवर टीका करत आहेत.
रमेश जारकीहोली यांनी कानडींवर टीका करताना ‘मराठी माणसे ही उत्तम असून कानडी यांना काहीच काम उरलेले नाही’ असे म्हटले आहे. सोबतच त्यांनी सिद्धरामैय्या हे चांगले व्यक्ती असून येडीयुरप्पा यांनी खूप भ्रष्टाचार केला आहे, असे सांगत त्यांनी त्यांच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचारी ठरवले आहे.
पीडित महिला व जारकीहोली यांच्यातील संभाषण
महिला – बेळगावात मराठी व कानडी खूप भांडतात?
जारकीहोली – मराठी माणसं चांगली आहेत. तर कानडींना काहीही काम नाही.
जारकीहोली – सिद्धरमैय्या देखील चांगले आहेत. येडीयुरप्पा यांनी खूप भ्रष्टाचार केला आहे.
महिला – तुम्ही दिल्लीला जाता का नेहमी. तुम्ही मुख्यमंत्री होणार?
जारकीहोली – प्रल्हाद जोशी मुख्यमंत्री बनतील.
जारकीहोली यांचे सेक्स सीडी स्कँडल
कर्नाटकचे मंत्री रमेश जारकीहोली यांच्यावर एका तरुणीने जॉब देण्याच्या आश्वासनावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पीडितेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर मंत्र्यांचे व तरुणीचे इंटिमेट व्हिडीओ देखील न्यूज चॅनेलवर दाखविण्यात आले.