रामराजे नाईक निंबाळकरांची जीभ घसरली, तिघांवर केली खालच्या शब्दांत टीका

सामना ऑनलाईन । सातारा

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची विरोधकांवर टीका करताना जीभ घसरली आहे. रामराजे यांनी “खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे हे तिघे पिसाळलेली कुत्री आहेत” अशी बोचरी टीका केली आहे. तसेच खासदार उदयनराजे भोसले यांना सांभाळा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडू असा इशारा रामराजे यांनी राष्ट्रादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला आहे.

महाराष्ट्रात सध्या नीरा देवघर पाणी प्रश्‍नावर चांगलेच राजकारण तापले आहे. खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांनी नीरा देवघर कालव्याच्या पाणी प्रश्नावर प्रतिक्रिया दिल्यानंतर आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वादात उडी घेती आहे. नीरा उजव्या कालव्याबाबत त्यांनी फलटण येथे नीरा उजवा कालवा लाभक्षेत्रातील शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी रामराजे यांनी “शरद पवार यांना आपण सांगणार आपला खासदार उदयनराजे भोसले यांना सांभाळा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडू” असा इशारा देत, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली.

आपली प्रतिक्रिया द्या