…जेव्हा रणबीर आलियासमोरच आपला शर्ट काढतो!

1488

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या आगामी ब्रह्मास्त्र या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असून ते चित्रीकरणासाठी वाराणसीला पोहोचले आहेत. या शूटिंगवेळचे त्यांचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत.

वाराणसीच्या राज घाट इथे ब्रह्मास्त्रमधल्या एका गाण्याचं चित्रीकरण सुरू आहे. या चित्रीकरणाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांनी हे फोटो व्हायरल केले आहेत. या फोटोंमध्ये रणबीर आलियासमोरच त्याचा शर्ट काढताना दिसत आहे. हे गाणं रेमो डिसुजा यांनी कोरिओग्राफ केलं आहे. या फोटोत आलिया लाल रंगाचे श्रग आणि निळ्या जिन्समध्ये दिसतेय. हा फोटो व्हायरल झाल्यामुळे या गाण्याविषयी आणि एकंदरीतच ब्रह्मास्त्र चित्रपटाविषयी चर्चा रंगताना दिसत आहेत.

ब्रह्मास्त्र चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी याने केलं असून यात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन, डिंपल कपाडिया, प्रतीक बब्बर हे कलाकारही मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 2020मध्ये प्रदर्शित होणार आहे.

पाहा फोटो-

आपली प्रतिक्रिया द्या