रणबीर-आलियाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया…

1992

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकमेकांनी बऱ्याच काळापासून डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहे. या दोघांनी अनेकवेळा एकत्र कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. आता इंडस्ट्रीमधील या हॉट कपलच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या पत्रिकेवर लग्नाची तारीख 22 जानेवारी, 2020 अशी लिहिण्यात आलेली आहे. या व्हायरल होणाऱ्या पत्रिकेबाबत आलियाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

आलिया भट्ट हिला एका विमानतळावर पत्रकारांनी गाठले आणि तिला व्हायरल होणाऱ्या पत्रिकेबाबत प्रश्न विचारला. पत्रकाराचा प्रश्न ऐकूण आलिया जोर-जोरात हसते आणि ‘आता यावर मी काय बोलू’ असे म्हणत तिने तिथून पळ काढला. परंतु आलियाने ही पत्रिका खोटी आहे अशी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे नक्की ही पत्रिका खरी आहे का कोणी खोडसळपणा केला याबाबत खुसाला झालेला नाही.

काय आहे पत्रिकेत?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्रिकेवर रणबीर आणि आलिया यांचे नाव लिहिलेले आहे. परंतु कार्डवर आलियाच्या वडिलांचे नाव चुकीचे लिहिण्यात आले आहे. आलियाच्या वडिलांचे नाव महेश भट्ट आहे, मात्र कार्डवर मुकेश भट्ट असे लिहिलेले आहे. यामुळे हे कार्ड खोटे असण्याच्या शक्यता जास्त आहेत.

दरम्यान, आलिया आणि रणबीर ही जोडी ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहे. या दोघांची ही एकत्रित पहिलीच फिल्म आहे. अयान मुखर्जी याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटामध्ये महानायक अमिताभ बच्चन हे देखील प्रमुख भूमिकेमध्ये दिसतील.

आपली प्रतिक्रिया द्या