आयपीएल फायनलला ‘बॉलिवूड’ तडका, पहिल्यांदाच होस्ट करणार ‘हा’ अभिनेता

46

सामना ऑनलाईन । मुंबई

आयपीएल २०१८ फायनलचा सामना २७ मे रोजी मुंबईमध्ये रंगणार आहे. या फायनल सामन्याला बॉलिवूडचा तडका देण्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. या सामन्यापूर्वी २ तास आधी होणाऱ्या कार्यक्रमाला होस्ट करण्याची संधी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला मिळाली आहे. रणबीर कपूर आयपीलचा ‘प्रील्यूड’ कार्यक्रम पहिल्यांदाच होस्ट करणार असून या दोन तासांसाठी त्याला एक कोटी रुपये एवढी भरभक्कम रक्कम मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावरील दमदार कलाकार एका कार्यक्रमाला कसा होस्ट करतो हे पाहण्याची संधी क्रीडा आणि सिनेरसिकांना असणार आहे.

डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलपूर्वी होणाऱ्या या दोन तासांच्या कार्यक्रमामध्ये अनेक सिनेकलाकार सहभागी होणार आहेत. यात बॉलिवूडचा दबंग सलमान खान, रेस-३ ची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, नवाबांची सून अभिनेत्री करिना कपूर आणि बॉलिवूडची स्टाईल आयकॉन अभिनेत्री सोनम कपूर सहभागी होणार आहेत. या सोहळ्याला ‘क्रिकेट फायनल्स पार्टी तो बनती है’ असे नाव देण्यात आले आहे.

सलमान-जॅकलिनच्या डान्सचे आकर्षण
फायनलआधी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ‘रेस-३’मधील ‘हीरिये’ या गाण्यावर थिरकणार आहेत. या कार्यक्रमात सलमान क्रिकेटबद्दलचे आपले ‘लव सिक्रेट’ पहिल्यांदाच जगजाहीर करणार आहे.

सलमानसह अभिनेता अनिल कपूरही या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. फिटनेसचा बादशहा जॉन अब्राहम ‘परमाणू’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात हजेरी लावेल. तसेच टीव्ही स्टारही येथे दिसणार आहेत. रवी दुबे, गौरव सरीन, आकृति शर्मा आणइ देशना दुहल हे टीव्ही स्टार या कार्यक्रमाची शान वाढवताना दिसतील.

आपली प्रतिक्रिया द्या