नको तो प्रकार करताना रणबीर कपूर व विकी कौशल कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधला सर्वात प्रतिष्ठीत फिल्मफेअर पुरस्कार सोहळा काल पार पडला. या सोहळ्यात रणबीर कपूरला संजू चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याच्या पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर जाण्याआधी रणबीरने त्याचा संजूमधील सहकलाकार विकी कौशलचे चुंबन घेतले. त्यांचा चुंबन घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संजू या चित्रपटात रणबीर कपूरने अभिनेता संजय दत्तची भूमिका केली होती. त्यात विकी कौशल हा संजूचा खास मित्र दाखवला होता. काल झालेल्या फिल्मफेअर सोहळ्याला आलिया, रणबीर व विकी कौशल एकत्र बसले होते. जेव्हा रणबीरला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. त्याने सर्व प्रथम आलियाच्या गालावर किस केले त्यानंतर त्याने विकी कौशलचे चुंबन घेतले.