रणदीप हुडाने दाखवली ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाची झलक, पाहा टीझर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 140 व्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा टीझर आज लॉन्च झाला. चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुडा याने सोशल मीडियावर टीझर प्रदर्शित केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)


रणदीपने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्याही प्रमुख भूमिका चित्रपटात पाहावयास मिळतील. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे बहुतांश शूटिंग पूर्ण झाले आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर शेअर करताना रणदीपने लिहिलेय, ‘या चित्रपटादरम्यान मला खूप काही शिकायला मिळाले. सावरकरांच्या जयंतीला टीझर प्रदर्शित करताना मला खूप अभिमान वाटत आहे.’