रणदिप हुड्डा करणार टिव्ही शो होस्ट 

सामना ऑनलाईन । मुंबई

‘दि बीग एफ शो’ या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच येणार असून या कार्यक्रमातून बॉलिवूड अभिनेता रणदिप हुडा छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. रणदिप हा शो होस्ट करणार आहे. येत्या मार्च महिन्यात हा शो सुरु होणार आहे.

या शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये समाजाची बंधने झुगारुन स्वत:ला सिद्ध करणाऱ्या महिलांच्या कथा दाखविण्यात येणार आहेत. रणदिप हुडाचा महिला फॅन क्लब मोठा असल्यामुळे महिलांच्या कथा दाखविण्यासाठी त्याची निवड केल्याचे सेटवरील सूत्रांनी सांगितले. बोल्ड विषयांवर आधारित कथा या शोमधून दाखवत असल्यामुळे या शोचा पहिला सिझन खूप गाजला होता. बिग बॉसचा विनर गौतम गुलाटी पहिला सिझन होस्ट करायचा.

आपली प्रतिक्रिया द्या