मोदीही दिल्लीला ‘रेप कॅपिटल’ म्हणाले होते, काँग्रेसच्या पलटवाराने भाजप अडचणीत

884
modi

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान मोदींच्या ‘मेक इन इंडिया’वर टीका करताना ‘रेप इन इंडिया’ असे शब्द वापरले होते. त्यावरून भाजपने आज लोकसभेत गदारोळ करत राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. मात्र काँग्रेसने मोदींच्या 2014 मधील प्रचारसभेची क्लिप जाहीर केली ज्यामध्ये खुद्द मोदीच दिल्लीला ‘रेप कॅपिटल’ असे म्हणाले होते. या क्लिपमुळे आता राहुल गांधी यांना लक्ष्य करणारी भाजप देखील अडचणीत आली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून मोदींचा तो व्हिडीओ ट्वीट केला आहे. ‘मोदीजी, देशात अराजकता पसरली आहे. त्यावरून देशाचे लक्ष हटवण्यासाठी संसद चालू दिली नाही. हे देशातील मुली आणि महिलांना कळलं पाहिजे. रेप-मनमानीच्या विरोधात निर्णायक पाऊल उचलणे आवश्यक आहे. रेप इन इंडिया मंजूर नाहीच आणि आता या संदर्भातील स्वत:चं विधान देखील ऐका, हे योग्य नाही तर तुम्ही स्वत: देखील माफी मागा’, असे रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या