राज्यात रंगपंचमी उत्साहात, बच्चेकंपनीसह तरुणाईने लुटला आनंद

98

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यभर रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळ पासूनच बच्चेकंपनीची रंगपंचमी सुरू झालेली होती. सकाळी ७ वाजल्यापासूनच गल्लीबोळात लहान मुले रंगपंचमी साजरी करताना दिसत होती. महिला आणि तरुणींही दुपारनंतर रंग खेळण्यात सहभाग घेतला.

रंगपंचमी सणामुळे अनेक ठिकाणी गाणी वाजवत जल्लोष करण्यात आला. यावेळी बेधुंद होऊन नाचणाऱ्या तरुणांच्या अंगावर पाण्याचे फवारेही सोडण्यात आले. अनेक ठिकाणी रंगामध्ये रंगलेल्यांचे चेहरेही ओळखू येत नव्हते. अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात रंगांची उधळण करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या