हजारो लिटर आमटी, लाखो भाकऱ्या आणि रंगदास स्वामींची पुण्यतिथी

20

सामना ऑनलाईन। जुन्नर

लाईक करा, ट्विट करा

जुन्नर इथे रंगदास स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी प्रमाणे आमटी-भाकरीची मिरवणूक काढण्यात आली. ही एक वेगळीच आणि अनोखी परंपरा असून गेली अनेक वर्ष इथे ती पाळली जाते.

उत्तर भारतातून   रंगदास स्वामी जुन्नरमधल्या आणे गावात आले आणि इथल्या मारुतीच्या मंदिरात राहिले. त्यांनी मारूतीरायाला आमटी-भाकरीचा प्रसाद दाखवायला सुरूवात केली. तेव्हापासूनची ही परंपरा आजही पाळली जात आहे. इथे ३ दिवस यात्रा भरते आणि या तीन दिवसात गावच्या पंचक्रोशीत घरी जेवण बनवलं जात नाही.

इथे येणाऱ्या प्रत्येकाला आमटी भाकरीचा प्रसाद दिला जातो. दरवर्षी होणारी लाखोंची गर्दी पाहून गावातील प्रत्येक जण भाकऱ्या आणि आमटीचं साहित्य जमा करतो. आणे तसेच आसपासच्या गावातून खोली भर भाकऱ्या जमा होतात. तसंच एका मोठ्या कढईमध्ये आमटी बनवण्याचं काम सतत सुरू असतं. एखा कढईमध्ये सुमारे पाचशे लिटर आमटी तयार होते. ३ दिवसात अशा जवळपास ३५ कढई आमटी लागते. या आमटी साठी लागणारं पाणी हे मोटर लावून कढईत सोडलं जातं. तूर डाळ, गुळ, खोबरं आणि गरम मसाल्यापासून ही आमटी बनवली जाते.

प्रसादाच्या पंगतीला आलेला माणूस कुठल्या थरातला स्तरातला,आर्थिक वर्गातला असो इथे सामान्य माणसासोबतच तो पंगतीला बसतो. इथे प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या आमटी भाकरीच्या चवीची सर इतर कुठेही येऊ शकत नाही असं सांगितलं जातं.

आपली प्रतिक्रिया द्या