सुनैना रोशनला हृतिकचे कुटुंब मारहाण करतंय, कंगनाच्या बहिणीचा गंभीर आरोप

सामना ऑनलाईन, मुंबई

अभिनेत्री कंगना रनौतची बहिण रंगोली चंदेल हिने हृतिक रोशनच्या कुटुंबावर पुन्हा एक गंभीर आरोप केला आहे. हृतिकची बहीण सुनैना हिला रोशन कुटुंब जबरदस्त मारहाण करत असल्याचा दावा रंगोलीने केला आहे. सुनैना मदतीसाठी सातत्याने कंगनाला फोन करत होती, आणि ती दरवेळा रडत तिला झालेल्या मारहाणीबद्दल सांगत होती असं रंगोलीने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

sunaina-roshanरंगोलीने केलेल्या ट्विटमध्ये दावा केला आहे की ‘सुनैना ही दिल्लीतील एका मुसलमान तरुणाच्या प्रेमात पडली आहे. रोशन कुटुंबाला ही गोष्ट आवडली नसून त्यांनी तिला मारहाण करायला सुरुवात केली आहे. दिल्लीतील एका महिला पोलीस हवालदाराकरवी सुनैनाला मारहाण करण्यात आली असून तिचा भाऊ हा तिला तुरुंगात डांबण्यासाठी प्रयत्न करत आहे.’सुनैना ही सातत्याने मदतीसाठी कंगनाला सातत्याने फोन करत असल्याचं रंगोलीने म्हटले आहे. ही बाब सार्वजनिक झाल्यास रोशन कुटुंब घाबरेल आणि तिला होणारी मारहाण थांबेल असं वाटत असल्याने आपण ही बाब ट्विटरद्वारे मांडत असल्याचं रंगोलीने म्हटले आहे.

ही बाब सार्वजनिक केल्याबद्दल रोशन कुटुंब कंगनाला नुकसान पोहचवण्यासाठी प्रयत्न करू शकतं असं रंगोलीने म्हटलं आहे. ही बाब लक्षात घेऊन मी सुनैनासोबतचे संभाषण रेकॉर्ड करून ठेवल्याचं रंगोलीने म्हटले आहे. सुनैनाने पाठवलेले मेसेजही मी सांभाळून ठेवल्याचं तिने सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी सुनैनाला मानसिक आजार असल्याचं वृत्त बाहेर आलं होतं. मात्र ही अफवा असून सुनैना ही मानसिकरित्या सुदृढ असल्याचं रंगोलीचं म्हणणं आहे.