Ranji Trophy पहिला दिवस शतकांचा; घरामी, मजुमदार आणि अगरवालची शतके

जेतेपदाचा शोध घेणाऱया रणजी करंडकाच्या उपांत्य लढतीत बंगाल आणि कर्नाटक या दोन्ही संघांनी पहिल्या डावात पहिल्या दिवशी दमदार मजल मारताना तीन शतके साजरी केली. बंगालने नाणेफेक जिंकताना सुदीप कुमार घरामी (112) आणि अनुस्तुप मजुमदार (120) यांच्या शतकाच्या जोरावर 4 बाद 307 अशी मजल मारली तर कर्नाटकने मयांक अगरवाल (ना. 110) आणि श्रीनिवास शरथ (ना. 58) यांच्या अभेद्य शतकी भागीमुळे 5 बाद 229 अशी दमदार मजल मारली.

गेली 35 वर्षे जेतेपदाचा शोध घेत असलेल्या बंगालने आज नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. करण लाल आणि अभिमन्यू ईश्वरनने 51 धावांची सलामी दिली, पण ते अवघ्या चार चेंडूंत त्याच धावसंख्येवर बाद झाले.

सुदीप, अनुस्तुपची द्विशतकी भागी

51 धावांवर सलामीवीर बाद झाल्यानंतर सुदीपकुमार आणि अनुस्तुप मजुमदार यांनी जबरदस्त खेळ करीत 69 षटके फलंदाजी केली. अनुस्तुपने तेरावे शतक ठोकताना 13 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याच्या शतकापाठोपाठ घरामीने आपले चौथे शतक साजरे केले. त्याने या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार लगावले. दिवसाचा खेळ संपायला पाच षटकांचा खेळ शिल्लक असताना आवेश खानने 241 धावांची भागी करणारी ही जोडी फोडली.

कर्णधार धावला कर्नाटकाच्या मदतीला

रणजी मोसमात दमदार खेळय़ा करणारा रविकुमार समर्थ आजच्या महत्त्वाच्या सामन्यात अपयशी ठरला. समर्थपाठोपाठ (3), देवदत्त पडिक्कल (9), निकीन जोस (18), मनीष पांडे (7) आणि श्रेयस गोपाळ (15) यांनी निराश केल्यामुळे कर्नाटकाने 112 धावांतच अर्धा संघ गमावला होता, पण एक बाजू लावून धरलेल्या कर्णधार मयांक अगरवालने श्रीनिवास शरथच्या साथीने कर्नाटकचा कोसळलेला डोलारा सावरला. मयांकने झुंजार फलंदाजी करताना 15 वे शतक पूर्ण केले, तर शरथने तिसरे अर्धशतक साजरे केले. या दोघांनी शेवटचे सत्र यशस्वीपणे खेळून काढत 117 धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळेच कर्नाटक दिवसअखेर 229 धावांपर्यंत पोहचू शकला.