करुण नायरची चमक

7

सामना ऑनलाईन । कोलकाता

करुण नायरचे दमदार शतक व चिधमबरम गौतमच्या ७३ धावांच्या खेळीच्या जोरावर कर्नाटकने येथे सुरू असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पहिल्या डावात दुसऱया दिवसअखेर ८ बाद २९४ धावा तडकावल्या. यामुळे त्यांना १०९ धावांची आघाडी घेता आली. विदर्भचा मध्यमगती गोलंदाज रजनीश गुरबानी याने ९० धावा देत कर्नाटकचा निम्मा संघ गारद केला.

गंभीर, चंडेलाची शतकी खेळी

अनुभवी खेळाडू गौतम गंभीर व कुणाल चंडेला या सलामीवीरांनी झळकावलेल्या शानदार शतकांच्या जोरावर दिल्लीने पुण्यात सुरू असलेल्या दुसऱया उपांत्य लढतीत दुसऱया दिवसअखेर ३ बाद २७१ धावा केल्या. दरम्यान, बंगालला पहिल्या डावात २८६ धावाच करता आल्या. बंगालकडून सुदीप चॅटर्जीने सर्वाधिक ८३ धावा तडकावल्या.

आपली प्रतिक्रिया द्या