रणजी ट्रॉफी म्हणजे आयपीएलचा गरिब भाऊ – सुनील गावसकर

997

‘रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूंच्या सामन्याच्या फी मध्ये जोपर्यंत व्यवस्थित वाढ केली जात नाही. तोपर्यंत आयपीएलच देशात प्रसिद्ध राहिल’, असे मत हिंदुस्थानचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी रणजी ट्रॉफी म्हणजे पैशाने श्रींमंत असलेल्या आयपीएलचा गरिब चुलत भाऊ आहे असे म्हटले आहे.

रणजी ट्रॉफीला देशभरातून फार कमी प्रतिसाद मिळतो. रणजी ट्रॉफीपेक्षा देशात आयपीएलचा उत्साह जास्त असतो. आयपीएल पाहायला चाहत्यांची जबरदस्त गर्दी असते. त्यावर बोलताना सुनील गावस्कर म्हणाले ‘जोपर्यंत रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूंच्या सामन्याच्या फीमध्ये वाढ होत नाही तोपर्यंत हे असेच सुरू राहणार’. दिल्लीत लाल बहादूर शास्त्री स्मारकाच्या इथे भाषण देत असताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

गेल्या महिन्यात आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव झाला असून त्यात कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला 15.5 कोटींना विकत घेतले. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅक्सवेलला 10.5 कोटींची किंमत मिळाली.

आपली प्रतिक्रिया द्या