एटीएम खतरे में! आजही होणार सायबर अटॅक?

27

सामना ऑनलाईन । सिंगापूर, टोरंटो

जगभरात वेन्नाक्राय या रॅनसमवेअरची भीती कायम आहे. उद्या सोमवारी कंप्युटर सुरू केल्यावर पुन्हा सायबर हल्ला होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

रविवारी तज्ञ कम्प्युटर रिस्टोर करून सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात गुंतले होते. ब्रिटनच्या मैलवेअर टेक या सिक्युरिटी रसिर्जने सोमवारीही असाच सायबर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. याआधीचा हल्ला रोखण्यात या संस्थेचा महत्त्वाचा वाटा होता. पहिला हल्ला आम्ही प्रयत्नांनी रोखला; मात्र दुसरा हल्ला यापेक्षा जबरदस्त असेल. त्याला रोखणे कितपत शक्य होईल याबाबत कंपनीने साशंकता व्यक्त केली आहे. येणारे व्हर्जन रोखणे कठीण आहे. त्यामुळे योग्य सुरक्षा घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

देशातील किमान ७० टक्के एटीएम मशीनमधील सॉफ्टवेअर अपडेट केलेले नाहीत. यामुळे हे लाखो एटीएम मशीन केव्हाही सायबर हल्ल्याचे शिकार होऊ शकतात. यामुळे रिझर्व्ह बँक, इतर बँका, मुंबई शेअर मार्केट, इतर वित्तीय संस्थांना ऍलर्ट देण्यात आला आहे. आऊटडेटेड विंडोज-एक्सपी या सॉफ्टवेअरचा उपयोग अजूनही ७० टक्के एटीएममध्ये होत आहे. बँकांना या यंत्रणेचा ज्यांच्याकडून पुरवठा होतो त्यांच्याच हाती याचे नियंत्रण आहे. दुसरीकडे मायक्रोसॉफ्टने विंडोज-एक्सपीचा सपोर्ट काढून घेतलेला आहे. एक्सपीसाठी सुरक्षा, इतर सुविधा देण्याचे मायक्रोसॉफ्टने २०१४ पासूनच बंद केलेले आहे. यामुळे एटीएम मशीन सायबर हल्ल्याच्या जाळ्यात सापडू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या