कॉपी करू नको बोलणाऱ्या ‘गानसम्राज्ञी’ लतादीदींना रानू मंडलचे उत्तर, वाचा सविस्तर…

7935


पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वे स्थानकावर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे गाणे गावून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या रानू मंडल हिचे ‘तेरी मेरी कहानी’ प्रदर्शित झाले. संगीतकार हिमेश रेशमिया याच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. गाणे प्रदर्शित होताच रानू मंडल यांनी लता मंगेशकर यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे.

रानू मंडल म्हणाल्या, ‘मी कोणाच्याही आवाजाची कॉपी केली नाही. मी माझ्याच आवाजात गाणे गायले आहे.’ तसेच लतादीदी या खुप मोठ्या गायिका आहेत. त्यांचे गाणे ऐकून अनेक जणांना गायक होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले असेल. परंतु ते सर्व लोक कोणाचीही कॉपी करतात असे म्हणता येणार नाही, असे म्हणत हिमेश रेशमियाने देखील रानू यांच्या भूमिकेला समर्थन दिले.

नक्की काय आहे प्रकरण
गाणे गावून उदरनिर्वाह करणाऱ्या रानू मंडल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रानू रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या. व्हायरल व्हिडीओमधून रातोरात गायिका झालेल्या रानू मंडल यांना बॉलिवूडमधील संगीतकार हिमेश रेशमियाने त्याच्या आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली. या गाण्याचा ट्रेलर इंटरनेटवर प्रचंड लोकप्रिय झाला होता. परंतु रानू यांच्या गाण्याच्या शैलीवर गानसम्राज्ञी लतादीदी यांनी प्रतिक्रिया देताना त्यांना मोलाचा सल्ला दिला होता.

मी गायलेली गाणी गावून, माझ्या नावामुळे आणि माझ्या कामामुळे कुणाचे भले झाले तर मी स्वतःला भाग्यवान समजते. मात्र कोणाची कॉपी करुन मिळणारी प्रसिद्धी दीर्घकाळ टिकत नाही”, असे लतादीदी म्हणाल्या होत्या. यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीका झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या