Video- …आणि दीपिकाच्या भीतीने लाईव्ह चॅट सोडून पळाला रणवीर!

2618

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊनमध्ये सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सगळे घरात राहून कोरोनाचा मुकाबला करत आहेत. या दरम्यान एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जात आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी यात आघाडीवर आहेत. लाईव्ह चॅटच्या माध्यमातून ते एकमेकांशी आणि चाहत्यांशी संवाद साधत आहेत. अशाच एका लाईव्ह चॅटमुळे सध्या नेटकऱ्यांची हसून पुरेवाट झाली आहे.

त्याचं झालं असं की, आयुष्मान खुराना इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅटिंग करत होता. या लाईव्ह चॅटिंगमध्ये थोड्या वेळाने रणवीर सिंगही सहभागी झाला. दोघंही गप्पा मारू लागले. रणवीरने आयुष्मानला तो नुकताच झोपेतून उठल्याचं सांगितलं. लॉक डाऊनमुळे वाढलेल्या केसांवरही त्यांनी गप्पा केल्या. या गप्पांमध्ये त्यांचा आवाजही वाढला होता.

अचानक गप्पा मारता मारता रणवीर आयुष्मानला, चल बाय मी जातो असं म्हणाला. आयुष्मानने त्याला विचारलं की तू कोणाला बाय म्हणालास? तेव्हा रणवीर त्याला म्हणाला की, तुझी वहिनी (दीपिका) मला ओरडतेय. सांगतेय की, ती देखील दुसऱ्या व्हिडीओ कॉलवर आहे. ओरडू नकोस, असं म्हणून रणवीर त्या चॅटमधून निघून गेला. त्यानंतर आयुष्माननेही प्रेक्षकांना दीपिका त्याच्यावर ओरडतेय, म्हणून तो निघून गेलाय, असं सांगून एकच खसखस पिकवली. लॉकडाऊनमुळे नवरा बायको एकमेकांना खूप वेळ देऊ लागले आहेत. घरकामातही नवऱ्यांचा सहभाग वाढत आहे. त्यावरून अनेक विनोदही फॉर्वर्ड होत आहेत. या नवरा बायकोच्या गंमतीना सेलिब्रिटीही अपवाद नाहीत, असं या गमतीदार चॅटने सिद्ध झालं.

पाहा हा गमतीदार व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या